husbnd commits suicide: धक्कादायक! पत्नीसह शेजार्‍यावर तलवारीने हल्ला; भीतीने पतीची गळफासाने आत्महत्याon July 21, 2021 at 5:11 pm

photo--MzeNds
म. टा. प्रतिनिधी, सांगली

भांडणादरम्यान पतीने करुन तिला गंभीर जखमी केल्याची घटना वाळवा तालुक्यातील तुजारपूर येथे घडली. पांडुरंग बाबुराव यादव (६०) असे पतीचे नाव असून लक्ष्मी असे पत्नीचे नाव आहे. या दरम्यान तीची मदत करण्यात पुढे सरसावलेले शेजारी वसंत बाबुराव पवार (वय ५५) यांच्यावर देखील तलवारीने हल्लाकरुन जखमी केले. घाबरलेल्या पांडुरंगने हल्ल्यानंतर घराची कडी लाऊन गळफास घेऊन केली. बुधवारी सकाळी हा प्रकार घडला असून लक्ष्मी यादव व वसंत पवार यांची प्रकृती गंभीर आहे. (husband commits out of fear after attacking wife and neighbor)

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, तुजारपूर येथील पवारवाडा परिसरात यादव कुटुंब वास्तव्यास आहे. शेतीवाडी करून पती-पत्नी उदरनिर्वाह करीत होते. त्याचा मुलगा परगावी वास्तव्यास आहे. घरी पती-पत्नीची किरकोळ कारणावरून नेहमी वादविवाद होत असे. बुधवार दि.21 जुलै रोजी सकाळी पांडूरंग यादव यांनी पत्नी लक्ष्मी हिच्याशी वाद केला. किरकोळ वाद वाढत गेला. या वादातून तलवार घेत पांडूरंग यांनी पत्नी लक्ष्मी हिच्यावर तलवारीने हल्ला चढवला. डोक्यावर व हातावर घाव वर्मी लागला.

क्लिक करा आणि वाचा-
दरम्यान रस्त्याने जाणार्‍या वसंत पवार यांनी का भांडण करता ? अशी विचारणा यादव यांना केली. यावेळी रागाच्या भरात पांडूरंग यादव यांनी वसंत पवार यांच्याकडे धाव घेतली. त्यांच्या डोक्यावर व हातावर हल्ला केला. या झटापटीत पत्नी लक्ष्मी रक्ताच्या थोरोळ्यात निपचिप पडली. आता पत्नी हल्ल्यात ठार मारली गेली या भितीपोटी पांडुरंग यादव यांनी अंगणातून घरात धाव घेतली. आणि घाबरून घरात जावून आतून कडी लावून घेतली.

क्लिक करा आणि वाचा-
दरम्यान शेजारच्या नागरिकांनी जखमी अवस्थेत लक्ष्मी व वसंत पवार यांना इस्लामपुरात खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांचेवर उपचार सुरू आहेत. दोन्ही जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. दोन्ही जखमींना दवाखान्यात नेल्यावर चुलत भाऊ व नागरिकांनी पांडुरंग यादव यांच्या घराचे दार ठोठावले. पण आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून खिडकीतून आत डोकावल्यावर बाथरूम समोरच्या बीमला गळफास लावलेल्या अवस्थेत पांडुरंग यादव-सासणे दिसून आले. पत्नीसह शेजार्‍यावर तलवारीने खुनी हल्ला करून त्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले.

क्लिक करा आणि वाचा-
याबाबतची फिर्याद सर्जेराव विष्णू सासणे यांनी दिली आहे. हल्लेखोर व मृत यादव हा तुजारपूर सोसायटीचा माजी अध्यक्ष होता.

en English
X