नाशिक : दोन अपघातात ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू; ३ शिक्षकांचा समावेशon July 21, 2021 at 4:16 pm

photo--nCpn
: नाशिक जिल्ह्यासाठी आजचा वार घातवार ठरला आहे. कारण जिल्ह्यात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात ( News) ७ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर वाढीव्हरे जवळ झालेल्या अपघातात ४ जणांचा तर नाशिक कळवण रस्त्यावर झालेल्या अपघातात ३ जणांनी आपला जीव गमावला आहे.

नाशिक कळवण रस्त्यावर चारचाकी गाडीवर अचानक झाड कोसळल्याने अपघात झाला. वरखेड फाट्याजवळ झालेल्या या अपघातात तीन शिक्षकांचा जागीच मृत्यू झाला आहे. संध्याकाळच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. इर्टिका गाडीवर झाड पडल्याने गाडीतील तीन इसम जागीच मृत्यूमुखी पडले.

वरखेड फाट्याजवळील अपघातातील मृतांमध्ये दत्तात्रय गोकुळ बच्छाव वय ५१ राहणार किशोर सूर्यवंशी मार्ग चौक, नाशिक, रामजी देवराम भोये वय ४९, नितीन सोमा तायडे वय ३२ राहणार रासबिहारी लिंक रोड यांचा समावेश आहे.

अपघातात ठार झालेले तीनही शिक्षक सुरगाना येथील शहीद भगतसिंग माध्यमिक विद्यालय अलंगुन येथील असल्याचे समजते. या अपघाताप्रकरणी पुढील तपास दिंडोरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अनंत तारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक कल्पेश चव्हाण आणि दिंडोरी पोलिस करत आहे.

दुसरीकडे, नाशिक शहराच्या वेशीवर वाढीव्हरेजवळही विचित्र अपघात झाला. मुंबई-आग्रा महामार्गावर कार आणि कंटेनरची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला. यामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला असून १ जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे.

en English
X